khichadi /recipe veg khichadi
साहित्य -
१ वाटी तांदूळ
१/२ वाटी मूग दाळ तूर डाळ
२ कांदे कापलेले
२ टोमेटो कापलेले
१ बटाटा लाब काप
फुल कोबी, गाजर, शिमला मिरची ,मटार, बिन्स १ वाटी
कोथिम्बिर
आले लसुन पेस्ट २ चमचे
जिरे १/२ चमचा
हिंग १/३ चमचा
मोहरी १/२ चमचा
हळद १/२ चमचा
धने पावडर१ छोटा चमचा
गरम मसाला २ चमचे
कांदा लसुन मसाला१ चमचा
मीठ
तेल २ पळ्या
दही १ मोठा चमचा
कृती -
कुकर मधे तेल टाकून आधी जिरे हिंग मोहरी टाकून प्फोडणी करावी .नंतर त्यात कांदे टाकून लाल होईपर्यंत परतावे ।
आले लसुन पेस्ट टाकावी . नंतर सर्वं भाज्या टाकून चांगले परतावे . परतून झाल्यावर मसाले हळद टाकून परत परतून घ्या .
नंतर तांदूळ डाळी टाकावे मीठ टाकावे नंतर ३ ग्लास पाणी टाकून वरून कोथिंबीर टाकावी . आणि कुकर च्या ३ शिट्टी काढाव्या
खिचडी तयार ग़रम लोणची पापड बरोपर सर्वं करावी .

No comments:
Post a Comment