दुधी थालीपीठ
वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे
साहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप बाजरीचे गव्हाचे व बेसन पीठ
३ हिरव्या मिरच्या,लसुन ठेचून
एक चमचा जिरेपूड
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तेल थालीपीठ भाजताना
कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरचीलसुन ,जिरेपूड , मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार सगळे पीठ घालून कणकेला भिजवतो तेवढे सैलसर भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तेल लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तेल सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लोणचे बरोबर खायला द्यावे.
No comments:
Post a Comment