Wednesday, March 23, 2016

मटार पुरी

matar puri

साहित्य -
१ वाटी ओले मटार
२ वाटी गव्हाचे पीठ
 ४ हिरवी मिरची
७/८लसुन पाकळ्या
१ वाटी कोथंबीर चिरलेली
१ चमचा जिरेपूड
मीठ
तेल तळण्यासाठी 

कृती -
आधी मटार, हिरवी मिरची ,लसुन ,कोथिंबीर,पाणी टाकून  बारीक दळून पेस्ट करावी .
नंतर त्यात मीठ जिरेपूड ओवा सगळे घालून .त्यात  मावेल तेवढे गव्हाचे पीठ टाकून गट्टा कणिक करावे .
व छोट्या पुऱ्या  लाटून तेलात मंद आचेवर तळून घ्याव्या .  

ह्या पुऱ्या लोणी बरोबर ,दही बरोबर आणि कढी सोबत छान लागतात .

लहान मुले आवडीने खातात . तेल चालत नसल्यास पुऱ्या लाटून थोडे तेल टाकून तव्यावर भाजता येतात . 

No comments:

Post a Comment