Sunday, March 20, 2016

महाराष्ट्रीयन पुरण पोळी


होळी रे होळी, पुरणाची पोळी 

पुरणपोळी / मांडे महाराष्ट्रातील मराठी मनाचा पारंपारिक गोड पदार्थ आहे. महत्वाच्या सर्व सणासुदीला हा पदार्थ बनवला जातो.  जावई बापूंच्या पंगतीला हा पदार्थ नसल्यास नवलच!! सोबत डाळीचा रसा (रश्शी) भात, खीर, कुर्डी, पापड, भजे असे सगळी मेजवानी बनवली जाते. सर्वसाधारण पने  पुरणपोळी अनेक प्रकारची  बनवली जाते . पण हरबर्याची डाळीची (चना डाळ) ची पुरणपोळी खूप प्रसिध्द आहे. खायला  खूप रुचकर लागते आणि बनवायला पण सोपी आहे.  पुरणपोळी २-३ दिवस ठेऊन खाऊ शकतो .चला  मग आपण आज पुरणपोळी बनूया. 

साहित्य :-

 १]    ३  वाट्या हरभरा डाळ
 २]    ३  वाट्या किसलेला गूळ
 ३]    १  वाटी साखर
 ४]    अर्धे जायफळ, ५,६ वेलदोडे
 ५]    १ १/२ वाटी कणीक  व १ १/२ वाटी मैदा
 ६]     चिमुटभर  मीठ,  पाऊन  वाटी  तेल

 कृती :-

  • हरभरा  डाळ स्वच्छ  निवडून  धुवून घ्यावी. 
  •  प्रेशर  कुकरमध्ये  हरभरा  डाळ  शिजवून  घ्यावी.
  • शिजलेली  डाळ  चाळणीवर  उपसून  पाणी  काढून  घेणे.  ह्या  पाण्याला  पुरणाचा  कट  म्हणतात.  पुरणपोळी बरोबर त्याचीच  आमटी  करतात. उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे पुरण पोळी हि गोड पदार्थासोबत उदा. आमरस, खीर  अथवा गुळवणी सोबत खाल्ली जाते. इतर सर्व भागात ती गुळवणी अथवा आमटी सोबत खाल्ली जाते. पुरणाचा  कट  काढल्याने  पोळी  हलकी  होते. 

  • डाळ  एका  जाड  बुडाच्या  पातेल्यात  घालून  घोटावी.  त्यात  गूळ  घालून शिजवायला  ठेवावी.
  • पुरण  चांगले  शिजले  की  पातेल्याच्या  कडेने  सुटू  लागते.  शिजवताना  प्रथम  पातळ  होते  व  नंतर  झाऱ्याला  घट्ट  लागू लागते.

  • पुरणयंत्राला  बारीक  जाळीची  ताटली  लावावी  व  शिजलेले  पुरण  गॅसवरून  उतरवून  त्यात  जायफळ,  वेलदोडे पूड  घालून गरम  असताना  पुरणयंत्रातूनअथवा बारीक चाळणीतून वाटून  घ्यावे.


  • कणीक व मैदा  चाळणीने  चाळून  घ्यावा  व  चिमुटभर   मीठ,  २ चमचे तेल टाकून  कणीक  सैलसर  भिजवावी.  




  • कणिक नीट मळल्यावर, १/२ तास थोडे तेल पाणी लाऊन ओलसर सुती कपड्याने झाकून ठेवावे नंतर कणिक चांगले मळून सैल झाले पाहिजे.




  • वाटलेले  पुरण  हाताने  सारखे  करून  घ्यावे. 
  • तयार झालेल्या कणकेचे निंबाच्या आकाराचे दोन गोळे घ्यावे. ते पुरीच्या आकाराचे लाटून घ्यावे. 
  • त्यात कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू ते एका पुरी वर पसरवावे.

  • दुसर्या पुरी ने हे सारण व्यवस्थित झाकून, हळू हळू नीट कडेने दाबत पोळी लाटावी.




  • मंद  आचेवर   तव्यावर  गुलाबी  सारखे  डाग  पडेपर्यंत भाजावी. ह्याच  रीतीने  सर्व  पोळ्या  कराव्यात.

No comments:

Post a Comment